कराडमधील जे बाबा टोळीवर मोक्का

  |   Sataranews

कराड : प्रतिनिधी

कराडमधील पवन सोळवंडे खून प्रकरणातील संशयित जुनेद शेख व त्याच्या जे बाबा टोळीवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. या बाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या टोळीमध्ये जुनेद शेखसह समीर मुजावर, शिवराज इंगवले, अल्ताफ पठाण, निहाल पठाण, मजहर पिरजादे, हैदर मुल्ला, पितांबर उर्फ पप्पू काटे, सिकंदर शेख, प्रमोद उर्फ आप्पा जाधव, निरज पानके, अक्षय उर्फ महादेव मोकाशी, दिवाकर उर्फ गोंड्या गाडे, विजय पुजारी, सोहेल मुलाणी, आकिब पठाण, अक्षय धुमाळ, समीर मोमीन, अल्ताफ शेख, आयुब बेली व एक अल्पवयीन अशा कराड, मलकापूर व परिसरातील गुन्हेगारी क्षेत्रातील २१ जणांचा समावेश आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Action-under-MCOCA-on-J-Baba-gang-in-Karad/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Action-under-MCOCA-on-J-Baba-gang-in-Karad/

📲 Get Satara News on Whatsapp 💬