भाजपामधील ओबीसी समाजाचं नेतृत्व पंकजा मुंडेंकडे-अमित शहा

  |   Maharashtranews

बीड : आगामी काळात भाजपामध्ये ओबीसी समाजाचं नेतृत्व पंकजा मुंडेंकडे असेल, असं पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अधोरेखित केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या सावरगावमधल्या भगवानभक्त गडावर त्यांच्या उपस्थितीत मुंडे भगिनींनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी शिक्षणाच्या माध्यमातून वंचित आणि ओबीसी समाजाच्या विकासासाठी काम केलं. पंकजा मुंडेही त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून समाजाचं नेतृत्व करत असल्याचं शाह म्हणाले. अर्थात, शाहांनी प्रचाराच्या सुरूवातीला न विसरता अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला.

या विरोधात बोलणाऱ्यांना जाब विचारण्याचं आवाहन त्यांनी केलं. सभास्थळी शाहांचं ३७० तिरंगा झेड्यांनी स्वागत करण्यात आलं. सभेच्या मंचावर बीड आणि अहमदनगरधील सर्व उमेदवार हजर होते....

फोटो - http://v.duta.us/DEt1kgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/oB2RGgAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬