भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे - शरद पवार

  |   Akolanews

मूर्तिजापूर : राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसुन सातत्याने शेतकºयांची फसवणूक करीत आहे. शेतकºयांप्रती आस्था नसलेल्या या सरकारने खोटी आश्वासने देऊन शेतकºयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाºया सरकारला हद्दपार करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मूर्तिजापूर येथील जाहीर सभेत केले.

या शासनाने नोटबंदी करुन काळा पैसा बाहेर आला नाही उलट सामान्य माणसाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्र हे उद्योजक राज्य असताना सुद्धा येथील तरुण बेरोजगार आहे. उलट येथील हजारो तरुणांना नोकरीतून कमी करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. हे राज्य आता तरुण पिढीच्या स्वाधीन करायचे आहे, यासाठीच जास्तीत जास्त तरुणांना उमेदवारी दिली आहे. यापुढे तरुण नेतृत्वाची भूमिका कृतीत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा शेतकरीवर्ग आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळेच येथील शेतकरी आत्महत्या करीत असून, देशात महाराष्ट्र या बाबतीत एक नंबरवर पोहोचले आहे. वर्षात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्यानंतरही सरकार कुठलीच भूमिका घेताना दिसत नाही. घेतलेले पैसे परत करणाºयांची शेतकºयाची जात आहे. कर्ज वसुलीच्या माध्यमातून शासनच शासनच शेतकºयांवर दबाव आणत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी शासनावर केला. आमच्या सरकारने शेतकºयांना सरसकट कर्ज माफी दिली होती. या सरकारने केवळ ३१ टक्के शेतकºयांचा फायदा केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

फोटो - http://v.duta.us/SsskegAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/E1NExAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬