महाघाडीचाच मुख्यमंत्री होणार : बाळासाहेब थोरात
कडेगाव : शहर प्रतिनिधी
भाजपा सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या सरकारला आता जनता धडा शिकवणार आहे. या निवडणुकीत महाघाडीचीच सत्ता येणार व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विचारांचा महाघाडीचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील वांगी येथे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात बोलत होते.
यावेळी राज्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार मोहनराव कदम, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम, सोनहीरा कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, माजी जी. प. सदस्य सुरेश मोहिते, मालनताई मोहिते आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बरोजगारी वाढली आहे. अशा या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. डॉ. पतंगराव कदम हे कडेगाव-पलूस मतदार संघालाच नव्हे तर अखंड महाराष्ट्राला लाभलेले वरदान होते. शिक्षण आणि रोजगार निर्मितीत त्यांचे कार्य उत्तुंग होते. कडेगाव-पलूस मतदारसंघाचे नाव घेतले तरी महाराष्ट्राला पतंगराव कदम आठवतात. त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजित कदम यांनीही वडिलांच्या नाव लौकीकास साजेशी कामगिरी केली आहे. पुरस्थितीत डॉ. विश्वजित कदम यांनी हजारो लोकांना मदत केली. परंतु, या दरम्यान भाजपा सरकारने कोणतीही मदत केली नाही. पुरात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना भाजपा सरकारच जबाबदार आहे....
फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/The-BJP-government-has-cheated-ordinary-farmers-says-balasaheb-thorat/1.jpg
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/The-BJP-government-has-cheated-ordinary-farmers-says-balasaheb-thorat/