सातारा : बापाकडून गळा आवळून दोन मुलांचा खून

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लहान मुलांचा गळा आवळून खून झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वडिलानेच ११ वर्षीय मुलीची व ७ वर्षीय मुलाचा खून केला आहे. दरम्यान, सर्वजण सध्या मुंबईतील घाटकोपर येथील राहणारे आहेत.

गौरवी मोहिते (११), प्रतीक मोहिते (७) अशी खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. चंद्रकांत मोहिते याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हे मूळचे कोयना नगर, रासाटी (ता. पाटण) येथील आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, मुंबईहून संबधित तिघेजण बेपत्ता झाले. कारमधून हे तिघे गेल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती समोर आल्यानंतर महामार्गावर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. बुधवारी पहाटे संबधित कार शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडली. मात्र यातील दोन्ही मुलांचा गळा आवळून खून झाला होता. संशयित आरोपी व त्या मुलाचा बाप तेथेच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Two-children-murdered-by-father-at-shirwal/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Two-children-murdered-by-father-at-shirwal/

📲 Get Satara News on Whatsapp 💬