सरकारने आधी भाजपच्या गुंडांना हद्दपार करावे; राजू शेट्टींचा घणाघात
सांगली : प्रतिनिधी
सरकारने आधी भाजपच्या गुंडांना हद्दपार करावे. मग शेतकर्यांसाठी आंदोलन करणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागावे. अन्यथा संघटनेच्या आंदोलनाचा हिसका सरकारला सोसणार नाही, असा इशारा संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
शेट्टी म्हणाले, सामाजिक, शेतकरी हितासाठी आंदोलन केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांना पोलिसांनी दोन वर्षे चार जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस दिली आहे. हा प्रकार म्हणजे सरकारची दडपशाही आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. कडकनाथ घोटाळ्यात या दोघांनी केलेले आंदोलन एका मंत्र्याला फारच झोंबले आहे. यामुळे त्याची सरकारमधील पत गेली आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स याला घाबरत नसल्याने पोलिसी बळाचा वापर करून सरकार दडपशाही करु पाहत आहे. शेतकर्यांसाठी, जनतेसाठी आंदोलन करणे हा गुन्हा आहे काय, आम्ही काय दहशतवादी, नक्षलवादी आहोत काय. यापुर्वीच्या सरकारच्या वेळी आम्ही अनेक उग्र आंदोलने केली, पण असा वाईट अनुभव कधीच आला नाही....
फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/maharashtra-election-2019-Swabhimani-Shetkari-Sanghatana-hit-BJP-government-over-notice-to-party-activist/1.jpg
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/maharashtra-election-2019-Swabhimani-Shetkari-Sanghatana-hit-BJP-government-over-notice-to-party-activist/