सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

  |   Maharashtranews

मुंबई : 'भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील', असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात केलं होतं. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. सुशीलकुमार शिंदे यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. आमच्या पक्षात अशी कुठलीही चर्चा नाही,असा विचार नसल्याचेही ते म्हणाले. या संकटाच्या काळात पवार साहेबांनी धुरा हातात घेतली पाहिजे त्यांच्या अनुभवाने काही बदल होईल अस काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय. काँग्रेसचे नेते असं बोलत असले तरी असं काही होणार नाही.

काल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणा पाच वर्ष सत्ता असताना का केल्या नाहीत ? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला. लोकांमध्ये चीड आहे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार म्हणून उद्धव ठाकरे आता आश्वासन देत आहेत. झुणका भाकर केंद्र ही दारूची दुकान झाली आहेत यावर आता चायनीज विकल जात चपटी आणि खपटी ची ही दुकान झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला....

फोटो - http://v.duta.us/LnP8gwEA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/WN-_uAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬