[ahmednagar] - एक गट सक्रिय; दुसरा अलिप्तच

  |   Ahmednagarnews

नगर भाजपमधील 'गट'बाजीने शिवसेनेत अस्वस्थता; 'पॅचअप' झाले आव्हानात्मक

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी करणाऱ्या शिवसेनेत दिवसेंदिवस अस्वस्थता वाढत आहे. भाजपचा एक गट शिवसेनेच्या बाजूने प्रचारात सक्रिय होत असताना दुसरा गट मात्र अजूनही अलिप्त असल्याने शिवसेनेच्या अस्वस्थतेत भर पडली आहे. शहर भाजप व शिवसेना यांच्यातील 'पॅचअप' दोन्हीकडील श्रेष्ठींसाठी आव्हानात्मक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बुधवारी (९ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता येथील नंदनवन लॉन्समध्ये होणाऱ्या सभेस शहर भाजपचे कोण उपस्थित राहतात, य़ाची उत्सुकता व्यक्त होत आहे.

नगर शहर भाजपमध्ये चार-पाच गट असल्याचे सांगितले जाते. विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष व माजी खासदार दिलीप गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचे दोन गट शहरात प्रामुख्याने कार्यरत आहेत. याशिवाय राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना मानणारे स्वतंत्र आहेत, तसेच महापालिका भाजपचा गटही स्वतःची वेगळी ओळख राखून आहे. अर्थात, या गटातील काही गांधी गटाशी तर काही आगरकर गटाशी स्वतःला जोडूनही आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर गांधी गट व शहर शिवसेना यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड व गांधी यांनी विविध कारणानिमित्ताने एकमेकांवर शाब्दिक शरसंधान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळेच, आता राठोड यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय गांधी गटाने अद्याप घेतलेला नाही. परंतु, दुसरा आगरकर समर्थकांसह अन्य युती समर्थकांचा गट मात्र सक्रिय झाला आहे. शिवसेनेच्या प्रचारातील भाजपच्या एका गटाची अलिप्तता मात्र शहरात चर्चेत आहे....

फोटो - http://v.duta.us/VOCNbwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/1vJ5JwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬