[ahmednagar] - 'जिल्हा मराठा'चा दसरा महोत्सव उत्साहात

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सर्व शाखा, शाळा, कॉलेज यांचा एकत्रित दसरा महोत्सव न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात उत्साहात झाला. या वेळी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थांचा तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांचा संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर, संस्थेने आयोजित केलेल्या आदर्श विद्यालय स्पर्धेत नगरच्या रेसिडेन्शिअल हायस्कूलला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल या शाळेचा २५ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेच्या वतीने दरवर्षी दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्‍वास आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, विश्‍वस्त अॅड. दिपलक्ष्मी म्हसे, सिताराम खिलारी, मुकेश मुळे, माणिक मोरे, अभय खानदेशे, जयंत वाघ, राहुल झावरे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांच्यासह संस्थेची विविध महाविद्यालये, विद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या महोत्सवाला उपस्थित होते. संस्थेचे सचिव खानदेशे यांनी संस्थेच्या सर्वांगिण कामाचा आढावा घेतानाच संस्थेची प्रगती, प्रस्तावित कामे, याबाबत मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष झावरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

फोटो - http://v.duta.us/fqoxVQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/q1GJLgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬