[ahmednagar] - दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीची लगबग
म. टा. प्रतिनिधी, नगर
दसऱ्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, सराफ बाजार, मोबाइल शॉपी येथे ग्राहकांची खरेदीची लगबग दिसत होती. अनेकांनी हा मुहूर्त साधून आगामी लग्नसराईच्या खरेदीची सुरुवात केली. यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या बाजारपेठेला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
साडेतील मुहूर्तांपैकी दसरा हा एक मुहूर्त मानला जातो. भारतीय संस्कृतीत यादिवशी वस्तू, सोने यांची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनांपासून ते मोबाइलपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत खरेदी करण्यास अनेक जण पसंती देतात. मंगळवारी (८ ऑक्टोबर) हा मुहूर्त साधत अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडल्याने बाजारामध्ये ग्राहकांची लगबग दिसत होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी विविध प्रकारच्या सवलती, योजना लागू केल्या होत्या....
फोटो - http://v.duta.us/WI4bYAAA
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/xDlahwAA