[ahmednagar] - धाकट्या मुलाबद्दल उद्धव म्हणाले, तो जंगलात रमणारा माणूस

  |   Ahmednagarnews

अहमदनगर: शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी सक्रीय राजकारणा प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांचे धाकटे चिरंजीव तेजस अहमदनगर जिल्ह्यातील प्रचारसभांमधून उद्धव यांच्यासोबत दिसून आले. मात्र, संगमनेरमधील सभेत बोलतानाच ठाकरे यांनी तेजस फक्त सभा पाहण्यासाठी आल्याचे सांगून तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

आतापर्यंत निवडणूक न लढविलेल्या ठाकरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सदस्य आदित्य यावेळी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या राजकारणातील सक्रीय झाल्याची चर्चा सुरू असतानाच धाकटे तेजस राजकीय सभेच्या स्टेजवर दिसून आले. त्यामुळे आता धाकट्यालाही राजकारणात आणले जाणार का, असे तर्क-वितर्क सुरू झाले. मात्र, ठाकरे यांनी स्वत: बोलताना याचे स्पष्टीकरण दिले. तेजस हा जंगलात रमणारा माणूस आहे. तो इकडे माणसांच्या जंगलात रमणार नाही. सभा कशी असते, ते पाहण्यासाठी तो आला आहे, असे सांगून उद्धव यांनी यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या नव्या पिढीला राजकारणात आणण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांतून सुरू असल्याने ही चर्चा सुरूच राहणार आहे.

फोटो - http://v.duta.us/owpv9gAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/5M-H6wAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬