[ahmednagar] - शिर्डी संस्थानावर नवी समिती; कोर्टाचे आदेश

  |   Ahmednagarnews

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबादः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगला झटका दिला आहे. शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाचे निर्णय औरंगाबाद खंडपीठाने नेमलेली नवीन समिती तपासणार आहे. ही समिती नगर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे, असे औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने नेमलेल्या शिर्डी संस्थानाच्या विश्वस्त मंडळाची मुदत २७ जुलै २०१९ रोजीच संपली होती. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळाचा तीन वर्षांचा कार्यकाल संपला आहे. १२ विश्वस्त मंडळाच्या समितीमध्ये सध्या केवळ सहा विश्वस्तच कार्यरत होते. राज्य सरकारने या समितीला मुदतवाढ दिली नाही. मुदतवाढ ही गॅझेट प्रसिद्ध करून आणि कारणे दाखवून दिली पाहिजे, असा नियम आहे. ही मुदतवाढ फक्त सहा महिन्यांसाठीच केली जाऊ शकते. राज्य सरकारने केवळ निवडणुकीचे कारण दाखवून ही मुदतवाढ केली नाही, असा आक्षेप घेणारी याचिका उत्तम शेळके यांनी खंडपीठात केली होती....

फोटो - http://v.duta.us/tMytIAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/a6CS-wAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬