[aurangabad-maharashtra] - अमित शहा यांनी घेतला ठेपल्याचा अस्वाद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दसऱ्यानिमित्त श्री भगवान बाबा यांच्या जन्मगावी सावरगाव येथे आयोजित मेळाव्याला उपस्थितीत राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे औरंगाबादला आले होते. ते औरंगाबाद विमानतळावर अर्धा ते पाऊण तास थांबले. विमानतळावरच त्यांनी औरंगाबादच्या ठेपला या गुजराती पदार्थाचा अस्वाद घेतला. शहा यांनी व्हेज सँडविचही मागितल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना धावापळ करावी लागली.
सावरगाव येथील श्री भगवान बाबा यांच्या जन्मगावी दसरा मेळाव्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विशेष विमानाने दुपारी पावणेबाराच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर पोचले. विमानतळावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यमंत्री अतुल सावे, अनिल मकरिये, शिरीष बोराळकर, कचरू घोडके आदींची उपस्थिती होती. यावेळी शाह विमानतळामधील उपाहारगृहात थांबले होते. त्यांच्यासोबत दिल्लीहून आलेले पक्षाचे नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधीही उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी तेथे नाश्ता केला. त्यांनी ठेपला या गुजराती पदार्थाचा अस्वाद घेतला. याशिवाय फळही खाल्ली. त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी कमी साखरेची ब्लॅक कॉफी तयार ठेवली होती. शहा यांनी अचानक व्हेज सँडविचची मागणी केली. तेथे व्हेज सँडविच नसल्याने ते शहरातून आणण्यासाठी तीन ठिकाणी कार्यकर्ते वाहने घेऊन गेली. सँडविच आणेपर्यंत शहा उपाहारगृहातून बाहेर पडले....
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/D8oC-gEA