[aurangabad-maharashtra] - निवडणुकीला धार्मिक झालर

  |   Aurangabad-Maharashtranews

भाजप शहराध्यक्षांसह 'एमआयएम'च्या माजी जिल्हाध्यक्षांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी घेतलेली माघार 'औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातील लढतीत रंगत आणणारी ठरणार आहे. २०१४मध्ये 'एमआयएम', शिवसेना, भाजप अशी झालेली तिरंगी लढत २०१९मध्ये चौरंगी होण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासापेक्षा धार्मिक कट्टरतेच्या मुद्द्यावरच ही लढाई होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या 'मध्य'वर त्यांच्याच धाटणीतील मानल्या जाणाऱ्या 'एमआयएम'ने २०१४मध्ये शिरकाव केला आणि हा गड शिवसेनेच्या हातून गेला. त्यावेळी विधानसभेवर इम्तियाज जलील निवडून आले. त्याला युतीतील दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणे हे महत्त्वाचे कारण मानले गेले. त्यासह जलील यांचा आश्वासक चेहरा म्हणून नागरिकांनी स्वीकारला. लोकसभेतही त्यांना याच मतदारसंघाने आघाडी दिली. त्यामुळे 'एमआयएम'कडून इच्छुकांची संख्या वाढली. त्याचवेळी युती झाल्याने शिवसेनेकडे मतदारसंघ आला आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरी होणार झाली मात्र, ते पेल्यातीच वादळ ठरले. भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी माघार घेतली तर 'एमआयएम'च्या माजी अध्यक्षांनी ही अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेना आणि 'एमआयएम'चे उमेदवारांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला. मागील वेळी शिवसेना-भाजप यांच्यातील विभागलेली मते विभागणार नाहीत, असे युतीच्या नेत्यांना वाटते तर, 'एमआयएम'ला विधानसभा, लोकसभेची पुनरावृत्ती होईल, अशी आशा आहे. त्याचवेळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडीसह भाकप, बहुजन समाज पक्षासह अपक्षांनीही चुरस निर्माण केली आहे. लोकसभेत 'एमआयएम'सोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभेत फारकत घेऊन स्वतंत्र उमेदवार दिला आहे. त्यामुळे मध्य विधानसभेची लढत चौरंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 'एमआयएम'कडून नासेर सिद्दिकी, शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल, 'राष्ट्रवादी'कडून कदीर मौलाना, वंचित बहुजन आघाडीकडून अमित भुईगळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून अॅड. अभय टाकसाळ, बहुजन समाज पक्षाचे नाना मस्के, शेतकरी कामगार पक्षाचे चेतन कांबळे यांच्यासह अपक्ष कीर्ती शिंदे, अन्वर अली, आयुब खान खलील पठाण, मोइनोद्दिन फारुकी, विनायक भानुसे, सुरेश गायकवाड आदी उमेदवार रिंगणात आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/g2goiAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬