[aurangabad-maharashtra] - पाण्याचा ताळेबंद मांडणार

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद - मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामविकास संस्था शंभर गावात पाण्याचा ताळेबंद मांडतील असे प्रतिपादन नरहरी शिवपुरे यांनी केले. ग्रामविकास संस्थेच्या वतीने पाच व सहा ऑक्टोबरला कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवपुरे बोलत होते. १९७२ च्या दुष्काळापासून दुष्काळ निवारणासाठी मृद व जलसंधारणाची विविध योजनेतून कामे झाली. पण, फारसा उपयोग झाला नाही. आता पाण्याच्या ताळेबंदातून हिशेब मांडून त्यानुसार पीक पद्धती व उत्पादक पाण्याचा वापर याशिवाय पर्याय नाही, असे शिवपुरे म्हणाले. लोकसहभागातून शाश्वत ग्रामीण विकास, संवाद कौशल्य, पाण्याचा ताळेबंद, विविध योजना, कार्यकर्ता विकास, पोषण आहार, पंचायत राज व व्यक्तिमत्व विकास या विषयावर विनय कानडे, स्मिता कुलकर्णी, मनोहर सरोदे, बापूराव भोसले, के. टी. वाघ, विजय सोनवणे, सरदारसिंग बैनाडे, निवृत्ती घोडके, लक्ष्मण शिंदे, प्रा. जयप्रकाश बागडे यांनी मार्गदर्शन केले.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/9gxp_gAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬