[aurangabad-maharashtra] - मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीला न्यायालयात आव्हान देणार: देशमुख

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जाला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला असला, तरी महाआघाडी त्याविरोधात न्यायालयात दाद मागेल, अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि लातूर शहरचे उमेदवार आमदार अमित देशमुख यांनी दिली.

राज्य सरकारविरोधात असंतोष असून, महायुतीमध्ये बंडाळीही झाली आहे. त्यामुळे, लातूर जिल्ह्यातील सहाही जागांवर काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या वेळीही देवेंद्र फडणवीस यांचा अर्ज वादात सापडला होता. निवडणूक आयोगाने त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला असला, तरीही न्यायालयात आव्हान देणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले. तसेच, काँग्रेस सोडून गेलेल्यांना जनताच जागा दाखवून देईल. त्यांच्या जाण्याने पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही, असेही त्यांनी या वेळी नमूद केले....

फोटो - http://v.duta.us/YfQu2wAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/81u9pAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬