[aurangabad-maharashtra] - यंदाही रंगणार अटीतटीचा सामना

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांनी माघार घेतल्याने औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीसमोर निर्माण झालेल्या बंडाळीचे आव्हान संपले असेल तरी एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासह तब्बल ३४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघात अटीतटीचा सामना होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात विकासाचा मुद्दा चर्चिला जाणार की पुन्हा धार्मिक व भावनिक मुद्यावर लढाई होणार हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.

काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना, भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. पण मुख्य लढत झाली ती भाजपचे अतुल सावे व एमआयएमचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांच्यात. त्यावेळी सावे यांनी ६४ हजार ५२८ मते मिळवत एमआयएमचे डॉ. कादरी यांचा ४२६० मतांनी पराभव करत विजय खेचून आणला होता. यंदाही असाच अटीतटीचा सामना रंगणार अशी चिन्हे आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/GIi2rAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬