[jalgaon] - शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेंना सुनावले

  |   Jalgaonnews

जळगाव: 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे, सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीकुमार शिंदे यांना उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुशीलकुमार शिंदे सांगू शकत नाहीत, ते काँग्रेस पक्षाबाबत सांगू शकतात असेही पवार म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, आम्ही एकाच आईची लेकरे आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढलेले आहेत असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले आहेत, हे सुशीलकुमार शिंदे यांचे वाक्य विधानसभा निवडणुकीसाठी झंझावाती प्रचारदौरे करत तरुणांच्या प्रभावित करणाऱ्या शरद पवारांना जराही रुचले नाही. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाबाबत बोलले असावेत अशा शब्दांत शरद पवार यांनी सुशीलकुमार यांना खडे बोल सुनावले आहेत. विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेत पवारांनी जळगाव जिल्ह्यातील विकासाची सद्यस्थिती, भाजप सरकारची पाच वर्षातील कामगिरी अशा विविध मुद्यांवर मते मांडली....

फोटो - http://v.duta.us/t949CgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/OSruhQAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬