[kolhapur] - कोल्हापूरच्या आर्याने जागवली संशोधक वृत्ती

  |   Kolhapurnews

लोगो : नवदुर्गा

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : येथील केआयटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये बी.ई.चे शिक्षण घेत असताना तिने संशोधनासाठी परदेशात जाण्याचे लक्ष्य ठेवले. त्यासाठीच्या परीक्षांची तयारी ती करीत राहिली. त्यातून उच्च शिक्षणासाठी तिला अमेरिकेतील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला 'मधूमेह आणि स्थूलपणा' या विषयावरील संशोधनपर पीएच.डी. करण्याची तिथेच संधी मिळाली. अशा जिद्दी संशोधक मुलीचे नाव आहे आर्या योगेश नाखे.

अंबाई टँक परिसरात आर्या नाखे राहते. तिचे आई-वडील एलआयसीमध्ये नोकरी करतात. बालपणापासून हुशार असल्याने त्यांनी तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तिने सेव्हथ डे हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. विवेकानंद कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावी, बारावी अशा दोन्ही टप्प्यांवर गुणवंत विद्यार्थिनी म्हणून तिचा नावलौकीक झाला. पुढे तिने येथील केआयटी कॉलेजमध्ये बायोटेक्नॉलॉजी विषयात बी. ई.ला प्रवेश घेतला. त्याचवेळी तिने उच्च शिक्षण अमेरिकेतील प्रगत विद्यापीठात करण्याचा निर्धार केला. त्यादिशेने तिची वाटचाल सुरू झाली. इंजिनीअरिंगचे शिक्षण चांगल्या गुणांनी ती उत्तीर्ण झाली. जीआरईची परीक्षा तिने दिली. त्यातही चांगले गुण मिळवून तिने स्वत:साठी परदेशातील शिक्षणाचे द्वार खुले केले....

फोटो - http://v.duta.us/AFsAPAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/Ut1D2wAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬