[kolhapur] - कोल्हापूरच्या लेकीचा तंत्रज्ञानात झेंडा

  |   Kolhapurnews

कोल्हापूर : परदेशात उच्च पदावर असलेल्या वरासोबत लग्न केल्यानंतर अनेक तरुणी तिथं स्थायिक झालो यातच धन्यता मानतात. काहीजणी तिथलं सुखासीन आयुष्य स्वीकारतात. पण, काहींनी मात्र अफाट मेहनत घेऊन जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर परदेशातही नावलौकिक मिळवत वेगळी वाट स्वीकारतात. मूळच्या कोल्हापूरच्या अश्विनी अभिजित पाटील यांनी विवाहानंतर अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत रहात संशोधनातून अटकेपार झेंडा रोवला आहे. त्या सध्या कॅलिफोर्नियामध्ये स्मार्टफोन बनवणाऱ्या 'ब्लॅकबेरी' कंपनीत संशोधक म्हणून कार्यरत आहेत. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अमेरिकेतही कोल्हापूरचे नाव उंचावले आहे.

खरंतर लग्नानंतर अनेक मुलींच्या करिअरला ब्रेक लागतो. त्यातही परदेशात उच्च पदावर कार्यरत असलेल्या मुलासोबत लग्न झाल्यानंतर तरुणी तेथील संसारात रममाण होतात. फारच कमी तरुणींना परदेशात आपल्या करिअरला आकार देता येतो. टाकाळा परिसरात अश्विनी यांचे घर आहे. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरात झाले. भारती विद्यापीठातून त्यांनी बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात पदवीचे शिक्षण घेतले....

फोटो - http://v.duta.us/Cp1YOgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/cOmqngAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬