[kolhapur] - डॉ. सुनेत्रा यांचे न्यूरोसायन्समध्ये संशोधन

  |   Kolhapurnews

tweet:satishgMT

कोल्हापूर : ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील विद्यापीठात न्यूरो सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवून कोल्हापूरच्या डॉ. सुनेत्रा ससे या सध्या लहान मुलांमधील मेंदूशी संबधित ल्युकोडिसट्रॉफी (Leukodystrophy) या आजारावर संशोधन करत आहेत. अमेरिकेतील दहाहून अधिक मेडिकल जर्नल व अधिवेशानात त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल 'अल्वी डोबेरी रिसर्च इन एक्सलन्स' या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील नामांकित चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये त्या सध्या कार्यरत आहेत.

डॉ. सुनेत्रा आणि त्यांचे पती अजिंक्य हे शनिवार पेठेतील खोलखंडोबा मंदिर परिसरातील रहिवासी. हे दाम्पत्य न्यूरो सायन्समध्ये संशोधक आहेत. सुनेत्रा यांना लहानपणापासून पेशी कशा काम करतात याविषयी उत्सुकता होती. याच आवडीतून त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये बी. एसस्सी. मायक्रोबॉयालॉजीसाठी प्रवेश घेतला. शिक्षण घेताना २००२मध्ये त्यांना स्कॉलरशीप मिळाली. एमएससी करण्यासाठी त्यांनी कराडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांना एक्लेव्ह स्कॉलरशीप मिळाली....

फोटो - http://v.duta.us/d2XqVgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/XQSsxgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬