[kolhapur] - समाजाच्या स्वास्थ्यासाठी धडपडणारी डॉक्टर

  |   Kolhapurnews

लोगो : नवदुर्गा

कोल्हापूर : ज्या प्रमाणे माणसाच्या प्रकृतीचे गणित विस्कटले, स्वास्थ्य बिघडले तर त्याला औषधाची गरज असते. अनेकदा काळजी घेऊनही शरीरावर होणारे चुकीचे परिणाम रोगाची लागण देतात. हीच गोष्ट समाजालाही लागू होते. काही लोकांच्या चुकीच्या प्रवृत्तींमुळे समाजाचे स्वास्थ बिघडते. त्यात बिघडणारी पिढी जर पौंगडावस्थेच्या उंबरठ्यावर असेल तर ही समस्या अधिकच गंभीर होते. समाज पोखरणारा हा रोग होऊच नये म्हणून डॉ. कल्याणी कुलकर्णी धडपडत आहेत. दानवाचा वध करणाऱ्या पुराणातील दुर्गेची कथा सांगितली जात असताना किशोरावस्थेतील मुलामुलींच्या मनातील राक्षसी वृत्तीवर संवाद कौशल्याने उपचार करणाऱ्या डॉ. कल्याणी यांनी समाजाच्या स्वास्थ्यासाठी वेगळी पाऊलवाट तयार केली आहे.

कल्याणी या होमिओपॅथीच्या डॉक्टर. मूळच्या हुबळीच्या. विवाहानंतर कोल्हापुरात आल्या. सुरूवातीला नवं शहर, नवी माणसं यांच्याशी सूर जुळवत त्यांचा कोल्हापूरकर होण्याचा प्रवास सुरू झाला. जोडीला होमिओपॅथीची प्रॅक्टीस सुरूच होती. सामाजिक तळमळ ही त्यांच्या स्वभावातच. डॉक्टर म्हणून समाजात वावरताना त्यांच्यातील याच सामाजिक कार्यकर्तीच्या नजरेला काही गोष्टी खटकल्या. कोल्हापुरातील अगदी शाळेतील पोरसवदा मुलांच्या तोंडी येणाऱ्या शिव्या ऐकल्यानंतर त्यांना अशा प्रवृत्तीच्या मुळाशी जाण्याचा ध्यासच लागला. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील या मुलांमध्ये बदल करण्यासाठी काय करता येईल याचं विचारचक्र कल्याणी यांच्या मनात सुरू झालं....

फोटो - http://v.duta.us/i80zIwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/NsmRHwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬