[mumbai] - उदयनराजेंच्या संपत्तीत ५ महिन्यांत दीड कोटींची वाढ

  |   Mumbainews

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात दाखल झालेले आणि सातारा लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत अवघ्या पाच महन्यांमध्ये दीड कोटी रुपयांची भर पडली आहे. भोसले राजघराण्याकडे सोने आणि हिऱ्यांचे ४० किलोंचे दागिने आहेत. सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे आणि माजी राज्यपाल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या लढत होत आहे.

उदयनराजे भोसले यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून संपत्तीचा तपशील समोर आला आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे सातारा लोकसक्षा मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे.

लोकसभा निवणुकीत उदयनराजे भोसले यांच्याकडे १३ कोटी ८१ लाखांची जंगम मालमत्ता होती. आता तित वाढ होऊन ती १४ कोटी ४४ लाखांपेक्षाही अधिक झाली आहे. उदयनराजेंकडे सोने आणि हिऱ्याचे दागिने. शिरटोप असे सुमारे ४० किलोचे दागिने आहेत. तसेच त्यांच्याकडे ऑडी, मर्सिडीज बेन्झ. इण्डेवर अशा कार आहेत. या बरोबरच त्यांच्याकडे १८५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. यात जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. सुखवस्तू हा आपला व्यवसाय असल्याचे उदयनराजेंनी शपथपत्रात नमूद केले आहे. उदयनराजेंवर १ कोटी ८२ लाखांचे वाहन कर्ज देखील आहे....

फोटो - http://v.duta.us/u-4g6QAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/pNVUMgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬