[mumbai] - कार्यालयात बसून सामान्यांची दुःख कळणार नाहीत!

  |   Mumbainews

भांडुपच्या आर. ए. डी. ए. व्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा राज्यकर्त्यांना चिमटा सामान्यापर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिला असून 'आमच्यापर्यत पोहोचा' अशी तरुण उमेदवारांना मैत्रीपूर्ण साद घातली आहे.

................

लोकशाहीने मतदारांना आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यात आपल्या देशातील युवा लोकसंख्येचा मोठा टक्का पाहता तरुण मतदारांची मतेही निर्णायक ठरत आहेत. मात्र तरुण मतदारांना उमेदवारांमधील कुठली वैशिष्ट्ये पसंत पडतील, तरुण की अनुभवी उमेदवाराला ते प्राधान्य देतील अशा अनेक मुद्द्यांवर 'मटा कट्टा'च्या व्यासपीठावर भांडुपच्या रामानंद आर्य डी. ए. व्ही. कॉलेजचे विद्यार्थी व्यक्त झाले. 'अलीकडे निवडणुकांमध्ये अनेक तरुण उमेदवार येत आहेत हे पाहून तरुण मतदार म्हणून आम्हाला आनंद वाटतो. मात्र इतक्या वर्षांपासून राज्यकर्ते आणि सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेली दरी कमी कशी करता येईल याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. नुसते कार्यालयात बसून सामान्यांची दुःख कळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचावे लागेल.' या शब्दांत या विद्यार्थ्यांनी तरुण उमेदवारांना मैत्रीपूर्ण सल्ला दिला आणि लोकप्रतिनिधींना चिमटाही काढला....

फोटो - http://v.duta.us/I1BJDgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/VbvpgAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬