[mumbai] - पेन्शनवाढीसाठी देशव्यापी आंदोलन

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शनवाढीच्या मागणीसाठी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीतर्फे १० ऑक्टोबरला देशभरातील सात हजार भविष्य निर्वाह निधी कार्यालयांवर धरणे आंदोलन व निदर्शने केली जाणार आहेत. मुंबई विभागातील आंदोलन चारकोप, कांदिवली, वांद्रे येथे होणार आहे. त्याचसोबत ईपीएफओ कार्यालय, ठाणे आणि नवी मुंबईतील वाशी व रायगड याठिकाणी एकाच वेळी सकाळी ११ ते १ या वेळेत आंदोलन होणार आहे. पुढच्या टप्प्यात ५ डिसेंबरला दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली.

कोशियारी कमिटी अहवाल लागू करा, ३१ मे २०१७चे परिपत्र रद्द करा, किमान पेन्शन नऊ हजार करा या प्रमुख मागण्या समितीतर्फे आंदोलनात केल्या जाणार आहेत. तब्बल ६५ लाख ज्येष्ठ नागरिकांचा पेन्शनवाढीबाबतचा प्रश्न प्रलंबित असल्याने भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन 'ठाणे जिल्हा पेन्शनर असोसिएशन'चे विष्णू फडणीस, 'रायगड पेन्शनर असोसिएशन'चे शिवाजी भोसले, समन्वय समिती मुंबईचे अध्यक्ष विनायक गोडसे, कार्याध्यक्षा प्रिया परब, ठाणे जिल्हा अध्यक्ष विकास कुलकर्णी, ठाणे शहर संपर्कप्रमुख अविनाश लोवलेकर, कल्याण शहराचे जयंत पाटणकर, कल्याण तालुका जयंत खरे व समन्वय समितीचे केंद्रीय सल्लागार सुधींद्र नंजनगूड यांनी केले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/J2nsMQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬