[mumbai] - प्रवाशांच्या बॅगांमधून परदेशात ड्रग्ज तस्करी

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी,

परदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांमध्ये ड्रग्ज लपवून त्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी दोन मुख्य तस्करांना शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून सहा लाखांचा चरसचा साठा हस्तगत करण्यात आला. या टोळीने देशातील अनेक विमानतळावरून परदेशात ड्रग्ज पाठविल्याचे उघड झाले आहे.

मस्जिद बंदर येथील पी. डिमेलो मार्गावर काही तरुण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटला मिळाली. पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांना याबाबतची माहिती देऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल वाढवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या ठिकाणी सापळा लावून यासिन अब्दुल आणि बादशाह अब्दुल समद या दोघांना अटक केली. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एक किलो ४०० ग्रॅम चरसचा साठा सापडला. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता हे दोघे मोठे रॅकेट चालवीत असल्याचे उघड झाले. प्रवाशांच्या बॅगांमध्ये ड्रग्ज लपवून ते परदेशात पाठविण्याचे काम हे दोघे करीत असून त्यांनी मुंबई. हैद्राबाद, बंगळुरू कोचीन या विमातनळावरून अशाप्रकारे अंमली पदार्थ पाठविले आहेत. कुठे आणि कुणाच्या बॅगांमधून हे ड्रग्ज पाठविण्यात आले याचा तपास पोलिस करीत आहेत.

फोटो - http://v.duta.us/9Wy1ogAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/aOpZ3AAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬