[mumbai] - परिसरातच होणार कचऱ्याचे रिसायकलिंग

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

घरातून निघणारा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर न जाता त्याचे परिसरातच रिसायकलिंग करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. त्यासाठी मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांत ३७ ठिकाणी रिसायकलिंग प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पात सुका कचरा आणि प्लास्टिक वेगवेगळे काढून त्याचे रिसायकलिंग केले जाणार आहे. दरम्यान, मुंबईत मागील दोन वर्षांत ७६ हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दुकानदार व फेरीवाल्यांकडून चार कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्य सरकारने २३ जून २०१८ पासून मुंबईसह राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू असून घरातील कचऱ्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचतात. त्यांची विल्हेवाट स्थानिक पातळीवरच लावण्यासाठी शहर आणि उपनगरांत ३७ ठिकाणी कचरा वर्गीकरण व रिसायकलिंग प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यापैकी शहर भागातील कफ परेड येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी किती कंपन्या निविदा भरू शकतील याचा अंदाज घेण्यासाठी पालिकेने 'स्वारस्य अभिरूची' अर्ज मागवले आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/MoClxAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬