[mumbai] - रिक्षाचोर अटकेत

  |   Mumbainews

मुंबई : पश्चिम उपनगरातील रिक्षांची चोरी करून त्या भाड्याने लावण्याचा व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा सांताक्रूझ पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून पाच चोरीच्या रिक्षा हस्तगत केल्या. वांद्रे पूर्व ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान चालणाऱ्या शेअरिंग रिक्षा चोरीच्या असल्याची माहिती सांताक्रूझ पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, हवालदार संतोष पाटील, आशिष भांड, शेंदरकर, शिरसाठ, परब, दळवी यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरीच्या रिक्षाचा शोध घेतला. यावरून खेरवाडी येथील महाराष्ट्र नगर येथुन मन्सूर अहमद मकसूद अहमद कसार (२५) याला अटक करण्यात आली. मन्सूरनेे पाच रिक्षा चोरून त्या भाड्याने दिल्या होत्या. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/9LH8AgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬