[mumbai] - वाहतूककोंडीची समस्या

  |   Mumbainews

विलेपार्ले मतदारसंघ बहुतांश नागरिक मराठी आणि गुजराती नागरिकांचा आहे. बहुतांश उच्चशिक्षित, उच्चभ्रू असलेला हा मतदारसंघ आहे. यामध्ये विमानतळ परिसरातील झोपडपट्टी, चकाला, सहार गावठाण यांचाही समावेश होतो. विलेपार्ले पूर्व आणि पश्चिमेकडील काही ख्रिश्चन वस्तीही यामध्ये काही प्रमाणात समाविष्ट आहे.

वाहतूक समस्या

विलेपार्ले येथील नागरिकांसाठी मुख्य समस्या ही वाहतूक कोंडीची आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. विमानतळ परिसरामध्ये नेहरू रोडजवळ तसेच सहार रोडवर संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडीमध्ये वेळ वाया जातो. अंतर्गत रस्त्यांवर फारसे खड्डे नाहीत. येथील जागरुक नागरिक समस्यांची स्वतः तड लावून घेतात असे सांगण्यात येते. त्यामुळे रस्त्यांच्या समस्या फारशा नाहीत. मात्र येथील रस्ते अरुंद असल्याने पार्किंगच्या समस्या भेडसावतात. डबल पार्किंगमुळे रस्त्यावरून चालणे कठीण होते. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर रिक्षा पार्किंग केले जाते, यामुळे नागरिकांनी त्रास होत असल्याची तक्रार अनेकदा केली आहे. ही समस्याही हळुहळू सुटेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे....

फोटो - http://v.duta.us/gp8rgAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/l_fIwgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬