[mumbai] - शिवसेना-भाजपला ३० जागांवर बंडखोरांचा फटका बसणार?

  |   Mumbainews

मुंबई: राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेना-भाजप महायुतीची बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याने या तीसही जागांवर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात ५० मतदारसंघात १४४ सर्वपक्षीय बंडखोरांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका शिवसेना-भाजप महायुतीला बसला आहे. राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्याने दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांना तिकीट मिळालेलं नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी अर्ज भरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काही बंडखोरांना थोपविण्यात शिवसेना-भाजपला यश आले असले तरी एकूण ३० जागांवरील बंडखोरांचं मन वळविण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील ३० जागांवर युतीला बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईतील तीन जागांचाही समावेश आहे....

फोटो - http://v.duta.us/w86HaQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/yr2gewAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬