[nashik] - दुष्ट प्रवृत्तीचा नाश

  |   Nashiknews

पंचवटीत रावणदहन

...

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

यंदाही रामकुंड येथील चतुःसंप्रदाय आखाड्यातर्फे रावणदहन करण्यात आले. गांधीतलावाशेजारी असलेल्या जागेत रावणाचा ४० फूट उंचीचा प्रतीकात्मक पुतळा तयार करण्यात आला होता. राम, लक्ष्मण, हनुमान, वानरसेना, राक्षससेनेची वेशभूषा केलेल्यांची पंचवटी परिसरातून मिरवणूक काढल्यानंतर रावणदहन करण्यात आले.

असत्यावर सत्याचा विजय व्हावा, दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा याचा संदेश देत विजयादशमीला रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा आहे.

श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची विजयादशमीला रावणदहनाने झाली. रामकुंड परिसरातून रामायणकालीन वेशभूषा केलेल्यांची सहवाद्य मिरवणूक पंचवटीत काढण्यात आली. यात अभिषेक आढळकर (श्रीराम), भाग्येश देशपांडे (लक्ष्मण), विवेकानंद घोडके (हनुमान), छोटूराम आढळकर (रावण), आदित्य शिंदे (कुंभकर्ण), रोहित कोठावदे (बिभीषण) यांनी वेशभूषा केली. त्यांची मिरवणूक रामकुंड परिसरात आल्यानंतर वानरसेना व राक्षससेना यांच्यात युद्ध झाले. येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. राम आणि लक्ष्मण यांनी सोडलेल्या बाणाने रावणाचे दहन करण्यात आले. रावणदहन बघण्यासाठी गांधी तलावाच्या भोवती, रामकुंडाच्या पार्किंग, रामकुंड आहिल्याराम मैदान, होळकर पूल या भागात गर्दी झाली होती....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/GQWQpwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬