[nashik] - बंदोबस्ताची रंगीत तालीम

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज, बुधवारी (दि. ९) शहरात आगमन होणार असून, त्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची रंगीत तालीम केली. दिवसभरात किमान तीन ते चार वेळा ही कसरत करण्यात आली. त्यामुळे जणू मंगळवारीच शहरात राष्ट्रपती अवतरल्याची अनुभूती शहरवासीयांनी घेतली.

राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अगोदरच वाहनांचा मार्ग, वेळ, बंदोबस्त आदींचा बारकाईने आढावा घेतला जातो. दौऱ्याच्या चोवीस तास अगोदरच या सर्वांची प्रत्यक्ष खात्री करून त्रुटी दूर सारण्यात येतात. त्यात वाहने, वाहनांचा मार्ग, वाहतूक बंदोबस्त यासह सुरक्षेच्या बारीक घटकांचा आढावा घेतला जातो. त्याबाबतचे अहवाल केंद्र सरकारच्या यंत्रणांसाठी महत्त्वाचे असतात. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी), लष्कराचा गुप्तचर विभाग आणि इतर केंद्रीय संस्था बंदोबस्ताचा क्षणक्षणाचा अहवाल घेत आहेत. मंगळवारी शहरात झालेल्या रंगीत तालमीदरम्यान आयुक्तांनी वाहतूक नियंत्रणाबाबत वेळोवेळी माहिती घेतली. बंदोबस्तासाठी तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोशाखाबाबत सूचनाही केल्या. राष्ट्रपती कोविंद शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी असून, तेथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी आर्टिलरी व कॅट सेंटर येथील कार्यक्रम आटोपून राष्ट्रपती रवाना होणार आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/5R1g7wAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬