[nashik] - मेहदरमध्ये बसविले 'पॅड डिस्पोजल मशीन'

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, कळवण

महात्मा गांधीजी यांच्या १५० वी जयंती व 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत कळवण तालुक्यातील मेहदर ग्रामपंचायतीत प्रथमच तालुक्यातील एकमेव सॅनिटरी पॅड इलेक्ट्रिक डिस्पोजल मशीन बसविण्यात आले. या मशीनचे उद्घाटन कळवणचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांच्या हस्ते करण्यात आले. प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करून श्रमदान करण्यात आले.

मेहदर ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी सॅनिटरी नॅपकिन मशिन बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वापरलेल्या पॅड चे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याने महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत हा उपक्रम राबविल्याने ग्रामसेविका वैशाली देवरे व सरपंच संगीता बागुल यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यावेळी उपसरपंच निवृत्ती बंगाल, मुख्याध्यापक डी. डी. रौंदळ, एस. वाय. देवरे, योगिता आहेर, ग्रामपंचायत सदस्य ताराबाई पवार, सिंधुताई जोपळे, पंडित बागुल, शरद आंबेकर उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/KTiacwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/qEyH0QAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬