[nashik] - यंदा पाहुणे घटणार!

  |   Nashiknews

यंदा पाहुणे घटणार!

महापूर आणि अतिवृष्टीमुळे नांदूरमध्यमेश्वरला पक्ष्यांचा किलबिलाट कमी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दिवाळीनंतर येणाऱ्या पाहुण्यांची संख्या यंदा घटणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे पक्ष्यांच्या आगमनावर त्याचा परिणाम होणार असून स्थानिक पक्षीदेखील स्थलांतरित झाले असल्याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच येथील पक्ष्यांच्या किलबिलाट कमी होणार असल्याने पर्यटनालाही त्याचा मोठा फटका बसणार आहे.

दरवर्षी दिवाळीनंतर म्हणजेच, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी देश-विदेशातील पक्षी नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात दाखल होतात. मात्र, यंदा सर्वत्र पावसाने तडाखा दिल्याने पक्ष्यांच्या आगमनावर त्याचा परिणाम होणार आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पूरस्थिती सातत्याने निर्माण झाल्याने खाद्य आणि पाणवेली वाढल्या आहेत. परतीच्या पावसामुळेही जिल्ह्यात पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. राज्याच्या विविध भागात पर्जन्यमान चांगले असल्याने परदेशी पक्ष्यांना अन्य पाणथळेही उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून नांदूरमध्यमेश्वरचे तळ गाठणाऱ्या पक्ष्यांना अन्य पाणथळी खुणावणार आहेत. सहाजिकच नांदूरमध्यमेश्वरकडे पक्ष्यांचा ओघ कमी राहणार आहे. दरवर्षी या अभयारण्यात देश-विदेशातील हजारो पक्ष्यांचे आगमन होत असले, तरी यंदा त्या आनंदावर विरजण पडणार असल्याचे निरीक्षण पक्षी निरीक्षकांनी नोंदविले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/mDacjAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬