[navi-mumbai] - एनएमएमटीचे चाक पायावरून गेल्याने वाहक जखमी

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बसचे चाक वाहकाच्या पायावरून गेल्याची दुर्घटना शनिवारी रात्री बेलापूर बसडेपोत झाली आहे. यामुळे बसवाहकाच्या पायाची बोटे आणि पायाचा कोपरा पूर्णपणे चाकाखाली चिरडला गेला आहे. सुनील नारायण कोळी असे या वाहकाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीबीडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

एनएमएमटी सीबीडी ते बामन डोंगरी ही २३ क्रमांकाची बस सीबीडी येथील बस आगारात रात्री नऊच्या सुमारास आली होती. या बसमध्ये सुनील कोळी हे बस वाहक होते. ते बसमधून खाली उतरले होते आणि बसजवळच उभे होते. मात्र त्याच वेळी बसचालकाने बस वळवण्यासाठी बस पुढे चालवली. तेवढ्यातच कोळी यांच्या पायावर बसचे चाक चढले. त्यामुळे त्यांचा पायाची पाचही बोटे आणि त्यावरील भाग चाकाखाली येऊन चिरडला गेला....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/EgW7MwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬