[navi-mumbai] - ओलाचालकाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
ओला गाडीचालकाची हत्या करून फरार झालेल्या दोघांना अखेर कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश नवगणे (२१) आणि किरण विष्णु चिकणे (२१) असे या दोघांचे नाव असून या दोघांनी लूटमारीच्या उद्देशाने ओला गाडीचालकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने या दोघांची सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
ओला गाडी चालवून उदरनिर्वाह करणारा ऐरोलीत रहाणारा गयासागर मिश्रा (२३) हा तरुण रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर-४ ए मधील आदर्श बारजवळ भाडे शोधत आला असताना, सुरेश नवगणे व किरण चिकणे हे दोघे त्याच्या गाडीत प्रवासी म्हणून बसले. त्यानंतर ही गाडी आदर्श बारच्या पाठीमागील गल्लीतून जात असताना, दोघांनी गयासागर याच्या जवळची रोख रक्कम व मोबाइल फोन लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र गयासागर याने विरोध केल्याने दोघा मारेकऱ्यांनी गयासागरच्या पोटावर आणि मांडीवर वार करून त्याच्या जवळची रोख रक्कम तसेच मोबाइल फोन लुटून पलायन केले होते. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी गयासागर याला पोलिसांच्या मदतीने वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना, गयासागरचा मृत्यू झाला. कोपरखैरणे पोलिसांनी दोघा लुटारूंविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच, खबऱ्यांच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना सुरेश नवगणे व किरण चिकणे या दोघांची माहिती मिळाली....
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/Dr1tIAAA