[navi-mumbai] - कोपरखैरणेत तरुणीची आत्महत्या

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

कोपरखैरणेतील बोनकोडे परिसरात रहाणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिव्या प्रदीप म्हात्रे (२०) असे या तरुणीचे नाव असून काही दिवसांपूर्वीच तिचे लग्न ठरले होते. मात्र तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्या म्हात्रे ही बोनकोडे भागात कुटुंबासह रहात होती. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घरामध्ये दिव्या व तिचे आजी-आजोबा होते. याचवेळी दिव्याने टेरेसवरील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर दिव्याचे आजोबा टेरेसवर कुत्र्याला खायला देण्यासाठी गेले असताना, त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती सगळ्यांना दिली. दिव्या अधुन-मधून तणावाखाली जात होती. सोमवारीसुद्धा ती तणावाखाली आल्याने तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र तिच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच दिव्याचे लग्न ठरले होते. कोपरखैरणे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/DZHp4gAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬