[navi-mumbai] - 'फ्लॅशमॉब'द्वारे मतदारांना साद

  |   Navi-Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मागील विधानसभा व यंदाची लोकसभा, या दोन्ही निवडणुकांत मतदानाचा टक्का सरासरी ५५ टक्क्यांदरम्यान राहिला आहे. तो वाढविण्यासाठी शहर जिल्हा प्रशासनाने 'फ्लॅशमॉब' अर्थात पथनाट्य जनजागृती मोहिमेचा आधार घेतला आहे. त्याआधारे तब्बल २५ लाख मतदारांना साद घातली जात आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये एकूण २५ लाख चार हजार ७३८ मतदार आहेत. या मतदारांकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. 'फ्लॅशमॉब'आधारे ही जनजागृती केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या सार्वजनिक व जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी हे सादरीकरण केले जात आहे. निवडणूक जवळ येईल तसे सादरीकरण अधिक जोमाने होणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सांगितले की, 'या फ्लॅशमॉबच्या माध्यमातून मतदार मुंबईकरांना आपले कर्तव्य बजावा, असा संदेश दिला जात आहे. याखेरीज ईव्हीएम यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र यांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येते. यामुळे मतदारांमध्ये जागृती निर्माण होते.'...

फोटो - http://v.duta.us/sjIWQQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/DHjhlQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬