[navi-mumbai] - बिबट्याच्या हल्ल्यात ग्रामस्थ जखमी

  |   Navi-Mumbainews

बिबट्याचा हल्ला नसल्याचा वन विभागाचा दावा

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

सकाळी जॉगिंगला गेलेल्या ग्रामस्थावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना पनवेल तालुक्यातील ओवळा गवाच्या हद्दीत घडली आहे. हल्ला झालेल्या ग्रामस्थाने बिबट्याचा हल्ला झाला असल्याचे सांगितले असले तरी वनविभागाने मात्र हा हल्ला बिबट्याचा नसल्याचा दावा केला आहे. बिबट्याच्या कोणत्याही पाऊलखुणा घटनेच्या ठिकाणी सापडल्या नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

पनवेल तालुक्यातील ओवळा गावात राहणारे धर्मा म्हात्रे हे सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी जॉगिंगसाठी आई गावदेवी मंदिर परिसरात गेले होते. डोंगराळ भाग असलेल्या परिसरात त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला असल्याचे धर्मा म्हात्रे यांनी सांगितले. घाबरून मोठ्याने आरडाओरड केल्यामुळे बिबट्या घाबरून पळाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही घटना घडली तेव्हा इतर कोणीही उपस्थित नव्हते. मात्र धर्मा भोईर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर बिबट्यानेच हल्ला केला, असे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेत धर्मा भोईर जखमी झाले असून त्यांच्या पाठीवर, डोक्याला मार लागला आहे. ही बाब पनवेल वनविभागाला समजताच पनवेलचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एस. सोनावणे यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात कर्मचाऱ्यांना पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्ला झालेल्या ठिकाणी कोणतीही पाऊलखुणा न सापडल्यामुळे बिबट्याचा हल्ला झाल्याचा त्यांना भास झाला असावा, अशी शक्यता सोनावणी यांनी व्यक्त केली. बिबट्याचा वापर असल्याची कोणतीही खूण या भागात सापडली नसल्यामुळे बिबट्या नसावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तरीदेखील आमचे कर्मचारी डोंगररांगाचा भाग असलेल्या या परिसरात शोध घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/j3JEUwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬