[navi-mumbai] - मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
खराब रस्ते, वाहन पार्किंगसाठी वाहनतळाचा अभाव आणि वाहनांवर वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे जेएनपीटीतील वाहनधारकांनी पुकारलेले आंदोलन जेएनपीटी आणि पोलिस प्रशासन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. मात्र दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण न केल्यास पुन्हा सर्व वाहतूकदार आपली वाहने रस्त्यावर थांबवतील, असा इशारा अखिल महाराष्ट्र राज्य मोटार मालक संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
जेएनपीटी बंदरात येणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी दररोज शेकडो ट्रक-ट्रेलरसारखी अवजड वाहने जेएनपीटी ते नवी मुंबई, ठाणे, पनवेल या दिशेने वाहतूक करत असतात. मात्र या वाहनांना योग्य रस्ते, गाड्या पार्क करण्यासाठी वाहनतळ यांसारख्या प्राथमिक सुविधाही पुरवल्या जात नाहीत. सध्या तर या मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अर्ध्या तासाच्या प्रवासाला दोन ते अडीच तास वाया घालवावे लागत आहेत. त्यामुळे त्रस्त होऊन या मार्गावरील वाहनचालकांनी स्वत:ची वाहने रस्त्याच्या कडेला लावून आंदोलन केले होते. यामुळे जेएनपीटीमधून येणाऱ्या मालाची वाहतूकही थांबली होती....
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/JI5s6QAA