[navi-mumbai] - लोकलच्या पेंटाग्राफवर अज्ञातानं फेकली बॅग; वाशी स्थानकात आग, धूर आणि घबराट

  |   Navi-Mumbainews

नवी मुंबई: हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात एका लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अज्ञात व्यक्तीनं पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकल्यामुळं ही आग लागल्याचं आता समोर आलं आहे. या घटनेत कुणीही जखमी झालं नाही. मात्र, ऐन कार्यालयीन वेळेतच हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला.

वाशी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील एका गाडीच्या पेंटाग्राफमध्ये अचानक बिघाड झाला. पेंटाग्राफनं पेट घेतला आणि बघता-बघता सगळीकडं धूर पसरला. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रांच्या मदतीनं तात्काळ हालचाल करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर ही गाडी कारशेडकडे रवाना करण्यात आली. मात्र, तोपर्यंत हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या होत्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती पूर्ववत व्हायला काही वेळ लागणार आहे. सध्या या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत आहेत....

फोटो - http://v.duta.us/BKfBRQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/5CQLJgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬