[pune] - अकरा उमेदवार रिंगणात

  |   Punenews

कोथरूड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ब्राह्मण महासंघाच्या उमेदवारासह एकूण १० जणांनी सोमवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या जागेसाठी भाजपचे चंद्रकांत पाटील, मनसेचे अॅड. किशोर शिंदे यांच्यासह अकरा उमेदवारांमध्ये अंतिम लढत होणार आहे.

'भाजप'ने चंद्रकांत पाटील यांना दिलेली उमेदवारी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 'मनसे'चे उमेदवार किशोर शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने कोथरूडच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या जागेसाठी भाजप, मनसेसह वंचित बहुजन आघाडी, आप, बहुजन समाज पक्ष, संभाजी ब्रिगेड, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, प्रजासत्ताक भारत पक्ष, अशा २५ जणांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये २१ जणांचे अर्ज पात्र ठरले; तर चार जणांचे अर्ज बाद झाले. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, आता राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे सहा उमेदवार आणि पाच अपक्ष उमेदवार मिळून ११ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/W7fs3AAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬