[pune] - झोमॅटो डिलिव्हरी बॉयने पळवला पाळीव कुत्रा

  |   Punenews

पुणे: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पाळीव कुत्र्याला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉट्टू असे या पाळीव कुत्र्याचे नाव असून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने त्याला पळवल्याची तक्रार कुत्र्याच्या मालकाने केली आहे. डॉट्टू हा बीगल प्रजातीचा आहे. डॉट्टूची मालकीण वंदना शहा यांनी या घटनेची संपूर्ण माहिती सोशल मीडियावर दिली आहे. यात आम्हाला मदत करावी असे आवाहनही त्यांनी लोकांना केली आहे.

कुत्र्याला पळवून नेण्याची ही घटना सोमवारी पुण्यातील कर्वे रोड येथे घडली. आपला डॉट्टू अचानक गायब झाल्याचे शहा दांपत्याच्या लक्षात आले. त्यांनी त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा कुत्रा फॅक्ट्री कॉम्प्लेक्स परिसरात खेळत असल्याचे दिसत होते. खेळता खेळता डॉट्टू परिसरात फिरूही लागला. त्यानंतर तो गायब झाला. काही तास उलटून गेल्यानंतही डॉट्टूचा काहीच पत्ता न लागल्याने शहा दांपत्यांची चिंता अधिकच वाढली....

फोटो - http://v.duta.us/0Sra6gAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/wIGJPAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬