[pune] - टिळकांसमोर बंडखोरीचे आव्हान
कसबा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी तीन उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे कसबा पेठेत 'महायुती'च्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोर विरोधकांप्रमाणेच शिवसेनेच्या बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. अर्ज माघारीनंतर कसब्यात १० उमेदवार रिंगणात आहेत.
कसबा पेठ मतदारसंघातून १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. या मतदारसंघात महायुती आणि काँग्रेस आघाडीच्या बंडखोर उमेदवारांनी अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले होते. सोमवारी काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अर्ज मागे घेऊन आघाडीचे अधिकृत उमेदवार अरविंद शिंदे यांना पाठिंबा दिला. परंतु, शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे कसब्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार टिळक यांना शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे....
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/RafVNwAA