[pune] - पुण्याला पुन्हा पावसाचा तडाखा; प्रवास टाळा!

  |   Punenews

पुणे : पुण्यात पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस शहर व परिसरात कोसळत आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

पुण्यावर १५ किलोमीटर उंचीचे जास्त घनतेचे ढग असून कमी वेळात जास्त पाऊस शक्य असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत व पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शहरातील सहकार नगर परिसरात रस्ते जलमय झाले असून रस्त्यावरील दुचाकी पूर्णपणे पाण्यात गेल्या आहेत.

पावसाचे महत्त्वाचे अपडेट्स...

सिंहगड रोड भागात जोरदार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात.

संतोष हॉल येथील मधुकर हॉस्पिटलजवळ रस्त्यावर पाणी साचले.

सनसिटी रोडवर अनेक झाडे कोसळली.

सिंहगड रोड परिसर, वडगाव बुद्रुक, नऱ्हे परिसरात वीज पुरवठा बंद...

फोटो - http://v.duta.us/luMwhwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/nl1UFwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬