[pune] - राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा रद्द

  |   Punenews

पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सर्वेसर्वा राज ठाकरे यांची आज पुण्यात होणारी पहिली सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. पुण्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मैदानात सर्वत्र चिखल झाल्याने आणि काही ठिकाणी पाणी साचल्याने मनसेला ही सभा रद्द करावी लागली आहे. लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेल्या व विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या मनसेची आज होणारी ही पहिली सभा होती. या सभेतून ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार होते. आजची राज यांची सभा कसबा मतदारसंघातील सरस्वती मंदिर संस्थेच्या नातूबाग मैदानावर होणार होती. पण, ती आता रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मनसेने ट्विटरवरून दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवून भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ बीडमधून केला आहे. तर मुंबईतील दसरा मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या मनसेची आज पहिली सभा होणार होती. गेल्या काही दिवसांपासून मनसेला सभेसाठी मैदान मिळत नव्हते. आता मात्र मैदान मिळाले परंतु, पावसाने तडाखा दिल्याने मनसेला ही सभा रद्द करावी लागली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. मात्र, या सभा घेण्यासाठी शहराच्या अनेक भागांत मैदानेच उपलब्ध नसल्याचा मुद्दा मनसेच्या माध्यमातून पुन्हा समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सरस्वती मंदिर संस्थेने मनसेला सभेसाठी परवानगी दिल्याचे पत्र दिले. आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही सभा होणार होती. परंतु, काल रात्रीपासून पुण्यात पावसाने हजेरी लावल्याने सभेच्या मैदानात चिखल झाला आहे. तर काही ठिकाणी पाणीही साचले आहे. सभेसाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, तसेच पावसाचा अंदाज असल्याने मनसेला ही सभा रद्द करावी लागली. राज यांच्या प्रचारास पुण्यातून शुभारंभ होणार होता. त्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्यासाठी त्या संबंधीत संस्थांना संपर्क केला. पण एकाही संस्थेने राज ठाकरे यांच्या सभेला मंजुरी दिली नव्हती. त्यानंतर मनसेने पुणे पोलिस आयुक्तांना पुण्याच्या अलका चौकात सभा घेण्यासाठी परवानगी मागितली. पण अखेर नातू बाग येथील सरस्वती विद्या मंदिराचे मैदान मिळाले होते, अशी माहिती मनसे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली....

फोटो - http://v.duta.us/KDhdvAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/79qVbQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬