[ratnagiri] - भाजपचे विचार समजून घेण्यासाठी संघाच्या मेळाव्याला गेलो: राणे
कणकवली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयदशमी उत्सवात सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर लक्ष्य ठरलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव व कणकवलीचे भाजप उमेदवार नीतेश राणे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे. 'भाजपची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो,' असा खुलासा त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर सध्या नीतेश यांचा संघाच्या गणवेषातील फोटो व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'ज्या पक्षात प्रवेश केला आहे, त्यांचे विचार, ध्येयधोरणं समजून घ्यायची होती. यासाठी मी संघाच्या मेळाव्यात सहभागी झालो होतो. जे मला ओळखतात, ते मला ट्रोल करणार नाहीत,' असं त्यांनी म्हटलं आहे....
फोटो - http://v.duta.us/CALhggAA
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/uIHTcgAA