[thane] - अंबरनाथच्या मनसे उमेदवारावर गुन्हा

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथमधील एका कार्यक्रमात प्रवीण गोसावी या तरुणाने हल्ला केला होता. प्रवीणने दिलेल्या फिर्यादीवरून कार्यक्रमाचे आयोजक आणि आरपीआयचे पदाधिकारी अजय जाधव आणि अंबरनाथ विधासनसभेचे मनसेचे उमेदवार सुमेध भवार यांच्यावर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ शहरात ८ डिसेंबर २०१८ रोजी आठवले नेताजी मार्केट मैदान परिसरात कार्यक्रमासाठी आले होते. प्रवीणने त्यांना भेटण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी उपस्थितांनी त्याला मारहाणही केली. यामध्ये प्रवीण जखमी झाला. त्यानेही याविरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून कार्यक्रमाच्या आयोजकांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यात अजय जाधव आणि मनसेचे अधिकृत उमेदवार सुमेध भवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी सुमेध भवार यांनी काही कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाच्या उद्योग प्रकोष्ठचे अध्यक्षपद मिळवले. युती झाल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला. नुकतीच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ऐन निवडणुकीची हा गुन्हा दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. माझा यात थेट सहभाग नव्हता. ही तक्रार आणि गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असून जाणीवपूर्वक निवडणुकीच्या वेळी दाखल करण्यात आल्याची शक्यता वाटते, असे सुमेध भवार यांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/alPEXQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬