[thane] - टीएमटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे हाल

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

सणासुदीच्या दिवसातही पगार वेळेवर होत नसल्याने तसेच इतर मागण्यांसाठी मंगळवारी दसऱ्याचा मुहूर्त साधत टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. पाच तास चाललेल्या या आंदोलनामुळे घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगारातून सकाळी नऊ वाजेपर्यंत एकही बस बाहेर न पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. मात्र, नंतर टीएमटी अधिकाऱ्यांनी धाव घेत कामगारांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टीएमटीमध्ये कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या वाहक आणि चालकांची संख्या मोठी आहे. कंत्राटदाराकडून आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. आठ तास राबूनही पगार कमी असल्याचे कर्मचारी सांगतात. त्यात पगारही वेळेत मिळत नसल्याने कर्मचारी नाराज असून सात तारीख उलटूनही पगार न मिळाल्याने कंत्राटी कर्मचारी अधिकच संतापले. त्यात दसरा सण आल्याने कर्मचाऱ्यांचा संतापाचा बांध फुटला आणि घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगारात कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पहाटे अचानक कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनात चालकांबरोबर वाहकही सहभागी झाल्याने पहाटेपासून आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. पगाराबरोबर कर्मचाऱ्यांच्या इतरही मागण्या असून या मागण्यांवर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. दसऱ्यामुळे सुट्टी असल्याने आंदोलनाचा तितका परिणाम जाणवला नसला तरी घरातून बाहेर पडलेल्या नागरिकांची बसअभावी गैरसोय झाली. आंदोलनाची माहिती समजताच टीएमटी अधिकाऱ्यांनी आगारात धाव घेत कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यास सुरुवात केली. प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सकाळी ९. १५ वाजता आपले आंदोलन मागे घेतले....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/0FWuKQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬