[thane] - डायघरमधून सहा किलो गांजा जप्त
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
शहरात अंमली पदार्थांची तस्करी चालू असून गुन्हे शाखा युनिट एकने डायघर परिसरातून सहा किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या तरुणाकडे गांजा आला कोठून, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याण चौक परिसरात २० ते २५ वर्षे वयोगटातील दोघे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या पथकाने आरोपीला अटक करण्याविषयी प्रयत्न चालू केले. येथील एका बारसमोर सापळा लावून अभिषेक भोसले (२०) याला ताब्यात घेतले. तो कल्याण तालुक्यातील नांदिवली भागात राहत असून त्याच्याकडून ७२ हजार रुपये किमतीचा सहा किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला. शिळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला नऊ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. हा तरुण कोणाला गांजाची विक्री करणार होता, याची कसून चौकशी पोलिस करत आहेत....
येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/VGRm8wAA